Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशPolitics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका

Politics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका

Subscribe

मोदी सत्तेत आल्यापासून संविधानास अपेक्षित असलेले कायद्याचे राज्य येथे दिसत नाही. न्याय, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता या संज्ञा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. जाती आणि धर्मांत भांडणे सुरू आहेत आणि देशाची संपत्ती अदानी या एकाच उद्योगपतीच्या कब्जात गेली आहे. भारताच्या संविधानाला हे अपेक्षित नव्हते, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

(Politics) मुंबई : मोदी सरकारने संविधान दिवस साजरा केला हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक देशात महात्मा गांधी यांना मानत नाहीत. त्यांचे लोक इथे महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्यांचे पुतळे उभे करतात, पण मोदी विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्या देशातील गांधी स्मारकांवर जाऊन माथे टेकतात. त्यामुळे मोदी सरकारने संविधान दिवस साजरा केला हे आश्चर्य वाटणारे असले तरी धक्कादायक नाही, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group criticizes Modi government regarding Constitution Day)

‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे घोषणा देऊन निवडणुका लढणाऱ्यांचा संविधानाशी संबंध काय? संविधान दिनाचा सरकारी कार्यक्रम संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. त्याच वेळी काँग्रेसने संविधान दिनाचा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दिल्लीत साजरा केला. ‘‘मोदी यांनी देशाचे संविधान वाचले नाही!’’ असा टोला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मारला. देशाची सध्याची स्थिती पाहता राहुल गांधी खरेच बोलले याविषयी शंका वाटत नाही, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti Govt : महायुतीच्या सत्तेचे सूत्र दिल्लीत ठरणार; अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी बैठक

मोदी सत्तेत आल्यापासून संविधानास अपेक्षित असलेले कायद्याचे राज्य येथे दिसत नाही. न्याय, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता या संज्ञा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. जाती आणि धर्मांत भांडणे सुरू आहेत आणि देशाची संपत्ती अदानी या एकाच उद्योगपतीच्या कब्जात गेली आहे. भारताच्या संविधानाला हे अपेक्षित नव्हते, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत आणि घटनात्मक पेचप्रसंगांवर न्याय देण्याऐवजी न्यायाधीश पलायन करतात. निवडणूक आयोग, राजभवन हे मोदी यांच्या अंधभक्तांचे अड्डे बनले आहेत. देशातील निवडणुका हा एक फार्स बनला आहे. मते आणि मतदार विकत घेतले जातात किंवा निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन विजय मिळवले जातात. हा आपल्या लोकशाहीचा खेळखंडोबा आहे आणि तो करणारे संसदेत संविधान दिवस साजरा करतात, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. (Politics : Thackeray group criticizes Modi government regarding Constitution Day)

हेही वाचा – Ajit Pawar : 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला शपथविधी; अजित दादांनी सांगितला पुढील दोन दिवसांचा कार्यक्रम


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -