घरमहाराष्ट्रPolitilcs : 'सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके...'; शिवेसना आमदारांच्या वादानंतर ठाकरे गटाची...

Politilcs : ‘सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके…’; शिवेसना आमदारांच्या वादानंतर ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज (1 मार्च) शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन आमदारांमध्ये शाब्दीक वाद झाल्याची माहिती समोर आली. शिवसेनेचे सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये हा वाद झाला. या प्रकरणी आता ठाकरे गटाने ट्वीट करत निशाणा साधला आहे. (Politilcs Boca united for the sake of power Criticism of Thackeray group after Shiv Sena MLAs dispute)

हेही वाचा – Rupali Chakankar : ठाकरे गटाकडून चाकणकरांवर गंभीर आरोप; अध्यक्षपदावरून हटवण्याचीही मागणी

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कंत्राटावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. मंत्री आणि आमदार यांच्यात झालेल्या वादाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांना विकास कामावरून जाब विचारताना त्यांचा थेट एकेरी उल्लेख केला. आपल्या मतदारसंघातील कामे कधी होणार? असा प्रश्न त्यांनी मोठ्या आवाजात विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वादावादी होऊन धक्काबुक्कीही झाली. मात्र अशी धक्काबुक्की झालीच नसल्याचा खुलासा करत दादा भुसे यांनी झाल्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने टीकास्त्र साेडले आहेत.

- Advertisement -

ठाकरे गटाने ट्वीट करताना म्हटले की, सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके आता एकमेकांना धक्काबुक्की करू लागले आहेत. स्वतः बदनाम आहेतच, पण यांनी महाराष्ट्राला सुध्दा पूर्ण बदनाम करण्याचं ठरवलंय! अशा शब्दात ठाकरे गटाने शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधाल आहे.

हेही वाचा – Nitin Gadkari: मी फक्त एक कार्यकर्ता, मला पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही, गडकरींची दिलखुलास उत्तरं

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात आमदारांची वर्दळ होती. दादा भुसे विधानभवनाच्या लॉबीतून जात असताना थोरवे यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्याशी विकासकामावरून जोरजोरात चर्चा सुरू केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून धक्काबूक्की झाली. त्यामुळे लॉबीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी तेथे उपस्थित शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. यामुळे सत्ताधारी शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसून आमदारांमध्ये वाद सुरू असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -