भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला मतदान

Polling start from 21st December for Bhandara and Gondia Zilla Parishad
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला मतदान

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा, तसेच त्याअंर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान आणि २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि त्याअंतर्गतच्या ७ पंचायत समित्यांच्या १०४, तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ आणि त्यांतर्गतच्या ८ पंचायत समित्यांच्या १०६ जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे १ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल.

सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जि.प. आणि पं.स.ची नावे

भंडारा जिल्हा परिषद- त्याअंतर्गतच्या पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर.

गोंदिया जिल्हा परिषद- त्याअंतर्गतच्या पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.


हेही वाचा – MLC election: आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा