घरताज्या घडामोडीमुंबईत २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने सुरु होणार 'पॉलिक्लिनिक'

मुंबईत २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने सुरु होणार ‘पॉलिक्लिनिक’

Subscribe

मुंबई महापालिका प्राथमिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने विविध ठिकाणी ‘पॉलिक्लिनिक’ सुरू आहेत, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी, अंधेरी येथे पार पडलेल्या प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण कार्यशाळेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना, पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी, येत्या २ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये टप्पेनिहाय पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने यांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सध्या महापालिकेचे दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कार्यरत असतात.

- Advertisement -

या वेळे व्यतिरिक्त ५० ठिकाणी सुरु होणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक हे सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा रुग्णसंख्या अधिक असल्यास दोन्ही सत्रात कार्यरत असणार आहे, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

या कार्यशाळेला परिमंडळीय सह आयुक्त / उप आयुक्त, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, विभाग स्तरिय सहाय्यक आयुक्त, मार्गदर्शक डॉ. रामस्वामी, माजी महा संचालक (आरोग्य सेवा) डॉ. सुभाष साळुंखे, विश फाऊंडेशन या संस्थेचे डॉ. राजेश सिंह व इतर प्रतिनिधी, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अमोल वानखेडे, डिजिटल हेल्थ मिशनचे उप संचालक डॉ. समीर कंवर व इतर प्रतिनिधी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, पाथ या संस्थेचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिकेच्या दवाखान्यांप्रमाणेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिकद्वारे देखील असंसर्गजन्य रोगांचे तपासणी व प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेह याबाबतची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा-सुविधांचे लोकसंख्या आधारित विश्लेषण हे विभाग स्तरिय पद्धतीने केले जाणार आहे. तसेच आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविका यांच्याद्वारे गृहभेटी देण्यात येऊन रक्तदाब विषयक माहिती गोळा करुन असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

विभाग स्तरावरील आवश्यक त्या सेवा-सुविधांसह पोर्टा केबिन उभारणी करण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि अभियंते यांना यापूर्वीच निर्देशित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिमंडळीय उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर नियमितपणे कार्यक्रमांचे पुनरावलोकन करण्याचेही आदेश डॉ. संजीव कुमार यांनी याप्रसंगी दिले.

मुंबईत ३४ टक्के रक्तदाबाचे व १९ टक्के मधुमेहाचे रुग्ण

महापालिका सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनी कार्यशाळेमध्ये माहिती देताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना व मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुंबईमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार साधारणपणे ३४ टक्के रक्तदाबाचे रुग्ण आणि १९ टक्के मधुमेहाचे रुग्ण हे १८ ते ६९ या वयोगटातील आहेत.


हेही वाचा : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -