घरमहाराष्ट्रपॉलिटेक्निकचे शिक्षण आता मराठीतून; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पॉलिटेक्निकचे शिक्षण आता मराठीतून; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Subscribe

नाशिक – नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून यापुढे पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य असेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नाशिक येथे लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; २० सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

- Advertisement -

महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्‍या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रात क्रांती घडवणार्‍या आपल्या देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, परंतु औद्योगिक क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी केवळ विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पाऊल उचलले असून डिसेंबरअखेर पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाची अध्ययन सामुग्री मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिसेंबरअखेर या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे वर्गात शिकविणार्‍या शिक्षकांना उपकरण (डिव्हाईस) उपलब्ध करून देणार असून शिक्षकांनी इंग्रजीतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मातृभाषेतून समजणार असल्याने ही पद्धत अधिक सोपी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – राजकारणातील ऐतिहासिक निर्णय! कम्युनिस्ट पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा

- Advertisement -

३१ हजार विद्यार्थ्यांनी निवडला मातृभाषेचा पर्याय

२०१७ मध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये केवळ ४० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती, मात्र आता शंभर टक्के प्रवेश पूर्ण होतात. राज्यातील ३५० पॉलिटेक्निक महाविद्यालयांपैकी १७१ महाविद्यालयांमधून ३१ हजार विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा पर्याय निवडला. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणे शक्य होणार असल्याने यंदा प्रवेश वाढतील अशी अपेक्षा आहे, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -