Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादानं पूजा चव्हाण प्रकरण दाबलं जातंय; फडणवीसांचा गंभीर आरोप

सरकारच्या आशीर्वादानं पूजा चव्हाण प्रकरण दाबलं जातंय; फडणवीसांचा गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरेप केले आहेत. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणात काही कारवाई होईल असं वाटत नाही. या प्रकरणाची परिस्थिती ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानं भाजप शिवसेना आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात फार काही कारवाई होईल असं वाटत नाही. या प्रकरणाची स्थिती ही ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी होईल. सरकारच्या आशीर्वादानं सर्व काही सुरु आहे. पोलीस हे प्रकरण जेवढं दाबता येईल तेवढं दाबत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. कुठल्याही परिस्थितीत हे प्रकरण दाबायचं अशीच सरकारची भूमिका आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लहान गोष्टींवर ट्विट करणारे गृहमंत्री कुठे गेले?

- Advertisement -

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. लहान लहान गोष्टींवर गृहमंत्री ट्विट करतात. मग आता प्रेस रिलीज का काढत नाहीत? असा सवाल बावनकुळे यांनी केला. संजय राठो कुठे गेले हे सरकारची जबाबदारी आहे, असं बावनकुळे म्हणाले. बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणिवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केला.


हेही वाचा –  संजय राठोड गायब नाहीत, गुरुवारी ते प्रकरणाचा खुलासा करणार- अजित पवार


- Advertisement -

 

- Advertisement -