Pooja Chavan Case: आत्महत्येपूर्वी पूजाने केलं होतं मद्यप्राशन, प्रकरणाला आल नवं ट्विस्ट

Pooja chavan
आत्महत्येपूर्वी पूजाने केलं होतं मद्यप्राशन, प्रकरणाला आल नवं ट्विस्ट

पूजा चव्हाण आत्महत्या (pooja chavan case) प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती तिच्या व्हिसेरा रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळे पूजाला दारु पाजण्यात आली की ती स्वत: प्यायली असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दोन दिवसांपूर्वी मोठी माहिती समोर आली होती. आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिटं पूजा हीचं माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं, असी माहिती समोर आली होती. त्यात आता तिच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये तिने आत्महत्येपूर्वी दारू प्यायल्याचं ही निष्पन्न झालं आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, असं असलं तरी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचं लिहून दिलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्या करण्याच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. दरम्यान, या संभाषणाचं रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागलं असून ९० मिनिटं हे संभाषण झालं होतं. ९० मिनिटं पूजा हीचं माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं, असी माहिती देखील समोर आली.

पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूजा चव्हाण आत्महत्येला तत्कालिन वनमंत्री शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राठोड यांनी २८ फेब्रुवारीला विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी राजीनामा दिला. तथापि, पूजाच्या आई-वडिलांनी या प्रकरणी वानवडी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात त्यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला नवं मिळण्याची शक्यता आहे.