Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Pooja Chavan Suicide Case: 'या' कारणामुळे झाला पूजा चव्हाणचा मृत्यू

Pooja Chavan Suicide Case: ‘या’ कारणामुळे झाला पूजा चव्हाणचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहेत. शिवसेना नेते संजय राठोड यांचा नावे आता भाजपाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय पुजा चव्हाणने पुणे शहरातील वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. सोशल मीडियावर टिक-टॉक स्टार अशी ओळख आहे. यात आता तित्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. यात आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड थेट संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

पुजाचा मृत्यू हा तिसऱ्या मजल्यावरुन पडून डोक्याला गंभीर दाखापत झाली. परंतु असेही बोलले जाते की तिचा मृत्यू होण्याआधी कोणीतरी तिच्या डोक्यावर कोणीतरी जोरदार हल्ला केला होता. तर अशीही माहिती समोर येत आहे की, तिला सोरायसेस आजार असल्याने आजारपणाला कंटाळुन हा निर्णय तिने घेतला. त्यामुळे अद्याप तरी तिच्या मृत्यू मागचे खरे कारण समोर येऊ शकलेले नाही. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यापासून मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे गेलेत? याबाबत कुठलीही माहिती नाही. ते पुण्यातील आढावा बैठकीलाही गैरहजर होते. त्यानंतर पुणे, मुंबई येथे असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

- Advertisement -

 

 

- Advertisement -