Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ घेणार राज्यपालांची भेट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ घेणार राज्यपालांची भेट

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून आरोप करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला संजय राठोड मात्र गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. याप्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ मुख्य आरोपी म्हणून संजय राठोड यांचे नाव घेत आरोप करत आहेत. चित्रा वाघ यांनी सतत ट्विट करत पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबधीत मंत्री संजय राठोड यांना पोलीसासमोर हजरे करण्याची मागणी करत आहेत.

- Advertisement -

याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. मात्र पोलिसांकडून तपासात उशीर होत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित बेपत्ता आरोपी संजय राठोडांचा तपास लवकर करावा यामागणीसाठी चित्रा वाघ आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज दुपारी ३.३० वाजता पोलिस महासंचालक यांची भेट घेऊन झाल्यानंतर त्या ४.४५ वाजता राज्यपालांच्या भेटीस जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये, पूजा चव्हाण प्रकरणातचीं संदिग्ध भुमिका संशयीत मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता, या संदर्भात आज दुपारी ३:३० वा.मा.पोलिस महासंचालक यांची तर संध्या.४.४५ वा.महामहीम राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेत आहे. असे म्हंटले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -