घरताज्या घडामोडीमी अजिबात धमक्यांना घाबरणारी नाही - चित्रा वाघ

मी अजिबात धमक्यांना घाबरणारी नाही – चित्रा वाघ

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले.

दोन व्यक्तींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पूजा चव्हाण आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. या प्रकरणाबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवसेना कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. दरम्यान चित्रा वाघ यांना धमकीचे फोन येत असून धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही, असे ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातोय. मुख्यमंत्री एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पाहत आहेत, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

जिथे महिलांवर अत्याचार होणार तिथे नडणारच

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नेहमीच स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी भाष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना धमक्यांचे फोन येत होते. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही, त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारच, असे ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेता आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्माने केलेल्या आरोपांवरूनही चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, मुंडे दोषी आढळल्यास नियमांप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी आहेत, पूजाच्या दोषींवर कारवाई होणारच – नीलम गोऱ्हे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -