घरताज्या घडामोडीभाजप नगरसेवकाने पूजा चव्हाणचा लॅपटॉप, मोबाईल केला गायब

भाजप नगरसेवकाने पूजा चव्हाणचा लॅपटॉप, मोबाईल केला गायब

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता भाजप विरुद्ध शिवसेना

राज्यातील बहुचर्चित पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता याप्रकरणात भाजप विरुद्ध शिवसेना असे काहीस चित्र निर्माण झाले आहे. एका भाजप नगसेवकाने पूजा चव्हाणच्या घरात बेकायदेशीर घुसून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल गायब केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या बीड महिला जिल्ह्याप्रमुख संगीता चव्हाण यांनी पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पूजाच्या मृत्यूनंतर पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी तिच्या घरात बेकायदेशीर रित्या घुसून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल घेतला. त्यानंतर लॅपटॉप आणि मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.

- Advertisement -

भाजपच्या नगरसेवकाने पूजा चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. बेकायदेशीर रित्या पूजाच्या मृत्यूनंतर तो तिच्या घरात घुसला आणि त्याने तिचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचे कृत्य केलं, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुखे संगीता चव्हाण यांनी केला आहे.

कोण आहे भाजप नगरसेवक धनराज घोगरे?

पुणे महापालिकेतील धनराज घोगरे हे नगरसेवक आहेत. वानवडी वॉर्डमधून भाजपच्या तिकीटावरून धनराज घोगरे नगसेवक पदावर विराजमान झाले. पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष पद आहे. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी गुन्हात दाखल करण्यात आला असून त्यामध्ये धनराज घोगरे यांचं नाव आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पूजा चव्हाण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्याची पंकजा मुंडेंची मागणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -