Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Pooja Chavan Suicide Case: पुणे पोलिसांच्या अहवालावर भाजपची टीका

Pooja Chavan Suicide Case: पुणे पोलिसांच्या अहवालावर भाजपची टीका

मुख्य संशयीत आरोपी संजय राठोड यांची चौकशी न करताच अहवाल दिल्याचा भाजपचा आरोप

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पोलिस महासंचालक आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे अहवाल सरकारकडे दिल्याचे समोर आलं आहे. परंतु मुख्य संशयीत आरोपी मंत्री संजय राठोडची चौकशी न करता हा अहवाल पूर्ण होऊचं शकत नाही. विविध मंत्र्यांच्या तो संपर्कात आहे असं ते म्हणतात तर त्यांच्याकडून पत्ता घेतं पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘ज्या १२ ऑडिओ क्लिप आहेत, त्यात स्पष्टपणे संजय राठोड याने कथित दोन तरुण अरुण राठोड आणि विलास त्यांच्याशी संभाषण करताना आत्महत्येला परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल घे इथे पर्यंतचं संभाषण झालं आहे. त्यामुळे संजय राठोड याच्या चौकशी शिवाय हा अहवाल बनूच शकत नाही. म्हणून जो काही आता चौकशी अहवाल आला आहे, त्याला काही अर्थ नाही आहे.’

- Advertisement -

‘याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे, त्याची अजून चौकशी नाही, तो बेपत्ता आहे. पण सत्ताधारी पक्षांमधील नेते संजय राठोड आमच्या संपर्कात आहे, असं सांगत आहेत. याबाबत मला आश्चर्य वाटत आहे. मात्र तुमच्या संपर्कात राहून काय करणार?, त्याने जनतेच्या संपर्कात यायला हवं. परंतु ते ११ दिवसांपासून बेपत्ता आहेत. सगळेजण शोध घेत आहेत. कुठंय संजय राठोड?,’ असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या की, ‘जर तुमच्या संपर्कात असेल तर तुम्हीच त्यांच्या संपर्कात राहणार, तुम्हीच त्याची चौकशी करणार नाही, तुम्हीच त्याचे अहवाल सादर करणार. तसेच प्रत्येक नेता सांगतोय, ते निर्दोष आहेत, त्याच्यावर अशाप्रकारची चिखल फेक होतेय. मग जर ते निर्दोष आहेत, तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मखलशी करण्याची काहीच गरज नाही. ज्या १२ ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत, त्याचा तपास कोण करणार? त्यामुळे संजय राठोडची जोपर्यंत चौकशी होत नाही. तोपर्यंत अहवालाला काडीची किंमत नाही.’


- Advertisement -

हेही वाचा – पूजा चव्हाण आत्महत्येचे गूढ वाढले


 

- Advertisement -