Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोडच्या घरात चोरी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोडच्या घरात चोरी

Related Story

- Advertisement -

टिकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड याच्या परळी येथील तांडा गावातील घरात चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. यात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि काही रक्कम लंपास केली आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाणचा मित्र होता. तसेच तो संजय राठोड यांच्याही जवळचा होता.

दरम्यान पूजा इंग्लिश स्पिकींग कोर्ससाठी पुण्याला आली होती. तेव्हाही अरुण तिच्याबरोबरच राहत होता. पूजाची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पूजाच्या आत्महत्येनंतर जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यातील आवाज अरुण राठोडचा होता असा दावा केला जात आहे.

- Advertisement -

तसेच पूजाने आत्महत्या केली तेव्हाही तो तिच्यासोबत होता. जी ऑॉडिओ क्लिप व्हायरल झाली त्यातही तो संजय राठोड यांना पूजा आत्महत्या करणार असल्याचे तो सांगत होता. तर तिचा मोबाईल ताब्यात घे अशा सूचनाही राठोड त्याला करत होता. दरम्यान, पूजाचा लॅपटॉपही अजून सापडलेला नाही, अशी चर्चाही आहे. यामुळे या लॅपटॉपच्या शोधातच अरुणच्या घरात चोरी झाली असावी असे बोलले जात आहे.


हेही वाचा – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा नाही!


- Advertisement -

 

- Advertisement -