Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: 'त्या' क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा नाही !

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा नाही !

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात नवनवे खुलासे केले जात आहेत. याप्रकरणाला शिवसेनेचे संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. संजय राठोड यांच्यासह अरुण राठोड हे नावही सतत समोर येत आहे. यासंदर्भातील अनेक ऑडिओ क्लिपही सोशल मिडियावर झाल्या. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण शिवसेना नेते संजय राठोड आणि अरुण राठोड यांचे असल्याचा दावा केला जात आहे. संजय राठोड यांच्यातील प्रेमसंबंधातून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपासह विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे मुख्य पुरावा म्हणून समोर आलेल्या ऑडिओ क्लिपचा पुणे पोलीस तपास करत आहेत. (In Pooja Chavan Suicide Case Villagers make doubt on Audio clip voice of Arun Rathod)
मात्र या ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा नसल्याचा दावा परळी ग्रामस्थांनी केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या ही घटना अत्यंत दुदैवी आहे. परंतु आता अरुणचे नाव पुढे येत आहे. संबंधीत प्रकरणातील व्हायरल होणाऱ्या क्लिपमधील आवाज अरुणाच नाही. अरुण हा सुशिक्षित मुलगा आहे. त्याच्या वडिलांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो २ दिवस बाहेर गेला आहे. मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करुन त्याचे कुटुंब पोट भरते. त्याच्या पुण्याच्या वास्तव्यास अधिक दिवस झाले नाही. परंतु पूजा चव्हाण आणि अरुण राठोड हे वर्गमित्र असल्याने त्यांची ओळख आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही घटना दुदैवी असली तरी या प्रकरणात संजय राठोडांसारख्या चांगल्या नेत्याला ओढणे योग्य नाही. कोणताही पुरावा नसताना फक्त ऑडिओ क्लिपवरुन बदनामी करणं योग्य नाही. पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल, विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करु नये अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी एका वृत्तपत्राला बोलताना दिली.

- Advertisement -

कोण आहे अरुण राठोड

अरुण सुभाष राठोड (वय 24) असे त्याचे पूर्ण नाव असून तो वनविभागात नोकरी करत आहे. मुळचा बीड जिल्ह्यातील परळी येथील दारावती तांडा येथील रहिवासी आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या तो संपर्कात असल्याची देखील चर्चा सुरू आहे. पुजा चव्हाण आत्महत्येपूर्वी तिच्या भावासोबत पुण्यातील वानवडी येथे राहात होती. अरुण राठोडही तेथेच राहात असल्याची माहिती मिळत आहे. अरुण राठोड यांचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या अरुण राठोड आपल्या कुटुंबीयांसोबत बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -