Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेऊ नये -...

जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेऊ नये – बंजारा समाज

Related Story

- Advertisement -

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीमध्ये आज बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक झाली. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात पुढची दिशा ठरवणाऱ्यासाठी पोहरादेवीमध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली. संजय राठोड यांनी कधी समोर यावं, याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला बंजारा समाजातील धार्मिक नेते, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. यावेळी संजय राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला. बंजारा समाजाच्या वतीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊ नये. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पोहरादेवी समाजाने केली आहे.

‘कोणत्याही राजकीय पक्षाला बळी न पडता, संजय राठोड यांच्यावर दबाव न आणता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. पूजा चव्हाण यांच्या आई-वडिलांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नये. संपूर्ण बंजारा समाज आणि संत-महंत सगळेजण संजय राठोड यांच्या पाठिशी आहेत,’ असं बंजारा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – राठोडांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बंजारा समाजाच्या महंतांचा पाठिंबा


 

- Advertisement -

 

- Advertisement -