Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Pooja Chavan Suicide Case: अखेर संजय राठोड २३ फेब्रुवारीला भूमिका मांडणार

Pooja Chavan Suicide Case: अखेर संजय राठोड २३ फेब्रुवारीला भूमिका मांडणार

Related Story

- Advertisement -

पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारीला आपली भूमिका मांडणार असल्याचे समोर आले आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर गेल्या १२ ते १३ दिवसांपासून संजय राठोड बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत? याबाबत काहीच माहिती अजून समोर आलेली नाही. पण राजकारणातील काही नेतेमंडळी संजय राठोड आपल्या संपर्कात असल्याचे सांगत आहेत. पण अखेर २३ तारखेला संजय राठोड याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड माध्यमांसमोर येत नाही, मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीस ते उपस्थित राहत नाहीत. पण आत वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारीला वाशिम येथील पोहरादेवी येथे उपस्थित राहणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत. यावेळी संजय राठोड पोहरादेवी आणि संत-महंतांच आशीर्वाद घेऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती पोहरादेवीच्या महंतांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

संजय राठोड यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीला संजय राठोड सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहणार आहेत. बंजारा समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन इथे नतमस्तक होण्याकरिता आणि आशीर्वादासाठी येणार आहेत.


हेही वाचा – Pooja Chavan Suicide Case: पुणे पोलिसांच्या अहवालावर भाजपची टीका


- Advertisement -

 

- Advertisement -