Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची गाडी मंत्रालयात, मंत्री मात्र नॉट...

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची गाडी मंत्रालयात, मंत्री मात्र नॉट रिचेबल

नॉट रिचेबल असलेले संजय राठोड मुंबईत?

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामध्ये अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. मात्र, त्यांची गाडी मंत्रालयाच्या परिसरात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता संजय राठोड मुंबईतच आहेत असं बोललं जात आहे. मात्र, संजय राठोड यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. कोणत्याही प्रकारे माध्यमांशी संवाद साधून भूमिका मांडू नका असे आदेश पक्षाने त्यांना दिले आहेत. तथापि, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का? हे देखील पाहावं लागेल.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने चांगलेच अडचणीत सापडले आहेत. नाव आल्यापासून संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. ते कुठे आहेत? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, त्यांची गाडी मंत्रालयात आहे. त्यामुळे ते मुंबईतच आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संजय राठोड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तथापि, प्रकरण संवेदनशील असल्यामुळे प्रसार माध्यमांशी बोलू नये अशी तंबी शिवसेनेने संजय राठोड यांना दिली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असताना आणखी मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

संबंधित मंत्री आणि कार्यकर्त्याचं संभाषण व्हायरल

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संबंधित मंत्री आणि कार्यकर्त्याचं संभाषण व्हायरल झालं आहे. या कॉल रेकॉर्डनुसार पूजा ही गर्भवती असल्याचं समोर येत आहे. अर्थात या प्रकरणात सत्य काय आहे हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे.


हेही वाचा – पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे; पंकजा मुंडे यांची मागणी


- Advertisement -

 

- Advertisement -