Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या आत्महत्याप्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव प्रखर्षाने पुढे येत आहे. भाजपाने शिवसेनेला आता धारेवर धरले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात आता राष्ट्रीय महिला आयोगाने पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांना राष्ट्रीय महिला आयोगाने चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबतची माहिती महिला आयोगाला ट्विटवर टॅग केली होती. तसेच प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी संजय राठोडांना नोटीस पाठवली आहे. (National Commission for Women take cognizance Pooja chavan suicide case)

या प्रकरणी रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनाही पत्र पाठविले आहे. या पत्रात लवकरात लवकर पोलिसांनी तपास अहवाल आयोगाला सादर करावा, तर याप्रकरणी काय कारवाई केली जाईल याची देखील माहिती द्यावी असे म्हटंले आहे. याप्रकरणात आता राज्याचे मुख्यमंत्री यांनीही स्पष्ट भूमिका देण्यास नकार दिला आहे. (Pooja Chavan Suicide case) त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून दोन नाजूक प्रकरणांनंतर हे तिसरे प्रकरण समोर आल्याने टीकेचे धनी ठरत आहे. (Pooja Chavan suicide case Maharashtra)

- Advertisement -

 

- Advertisement -