Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ...

पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी

पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवलेल्या जबाबावरुन संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली असल्याची चर्चा

Related Story

- Advertisement -

पुण्यामध्ये काही महिन्यांपुर्वी पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच आरोप शिवसने नेते आणि माजी वनमंत्री राठोड यांच्यावर करण्यात येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवलेल्या जबाबावरुन संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली असल्याची चर्चा होती. यावर चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चीट मिळाली असल्याच्या बातम्या दाखवल्या जात होत्या याचि सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यावर पुणे पोलीस आयुक्तांनी अजून तपास सुरु असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -

पुणे आयुक्तांनी असेही म्हटलं आहे की, क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही परंतु माध्यमांना किती वेळा सांगणार यामुळे चित्रा वाघ यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, जर या गोष्ट खोटी असेल तर पुणे पोलिसांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून सगळ्या प्रसार माध्यमांना त्याची माहिती द्यावी अशी विनंती करण्यात आले आहे. बातम्यांवरुन लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा डाव आहे का असा संशय निर्माण होत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. न्याय मिळण्यासाठी एफआयआर देखील झाला नाही आहे. याचे कारण सांगण्यात आले आहे की, पूजा चव्हाणच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांचा कोणावरही आरोप नसल्यामुळे कोणावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. अनेक क्लीप्स, फोटोज, रेकॉर्डींग बाहेर आल्या त्या आवाजावरुन लहान पोरगंही सांगु शकते की तो आवाज कोणाचा तसेच आम्ही सांगतो आहे की, हा आवाज संजय राठोडचा असल्याचा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -