2013 साली हरवलेल्या पूजाचा मुंबई पोलिसांनी लावला 9 वर्षांनी शोध

पूजाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी आसपासच्या परिसरामध्ये पूजा हरवल्याचे पोस्टर लावले, परंतु त्यावेळी काही उपयोग झाला नाही. परंतु आता चक्क 9 वर्षानंतर विलेपार्लेच्या नेहरूनगर झोपडपट्टीत एक अल्पवयीन मुलगी राहत असल्याचा संशय वरिष्ठ निरिक्षकांना मिळाली.

मुंबईमधून एक अनोखी बातमी समोर येत आहे. 2013 साली अपहरण झालेल्या एका लहान मुलीचा चक्क ९ वर्षांनी मुंबई पोलिसांना शोध लागला आहे. 9 वर्षांपूर्वी त्या मुलीचं शाळेतून घरी येताना अपहरण झालं होतं. तेव्हापासून त्या मुलीचा शोध सुरू होता. दरम्यान, आता डी.एन.नगर पोलिसांनी नऊ वर्षांनी त्या मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव पूजा असून ती अंधेरीमधील गिल्बर्ट हिल येथे राहायची. 2013 साली पूजा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. शाळा सुटल्यावर शाळेतून घरी जाताना वाटेत एका हॅरी नावाच्या व्यक्तीने तिचं अपहरण केलं. शाळा सुटल्यानंतर पूजा घरी आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबियांनी शाळेत, तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. पण पूजाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात पूजा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पूजाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी आसपासच्या परिसरामध्ये पूजा हरवल्याचे पोस्टर लावले, परंतु त्यावेळी काही उपयोग झाला नाही. परंतु आता चक्क 9 वर्षानंतर विलेपार्लेच्या नेहरूनगर झोपडपट्टीत एक अल्पवयीन मुलगी राहत असल्याचा संशय वरिष्ठ निरिक्षकांना मिळाली. सर्व सत्यता पडल्यावर एका 9 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीची माहिती उघड झाली.

एका हॅरी जोसेफ डिसोझा नावाच्या व्यक्तीने मुल होत नव्हतं म्हणून पूजाचं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून पूजा आणि त्याच्या पत्नीला 4 वर्ष गावी ठेवलं होतं. त्यानंतर त्याने त्या दोघींना मुंबईमध्ये आणलं.


हेही वाचा :मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सर्रास येतात गावठी कट्टे