घरमहाराष्ट्रवैतरणा खाडीवरील मृत्यूचा पूल

वैतरणा खाडीवरील मृत्यूचा पूल

Subscribe

ग्रामस्थांकडून रेल रोकोचा इशारा

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकानजीकच्या खाडीवरील ब्रिज क्रमांक 92 ग्रामस्थांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावर शेकडो जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील पाच महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या विषयावरून ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

वैतरणा स्थानकाजवळच्या दोन्ही खाडी पुलाच्या मधोमध वाढीव आणि वैतीपाडा ही दोन गावे वसली असून या गावाची लोकसंख्या साधारण दोन ते अडीच हजाराच्या घरात आहे. या भागातून दररोज मोठ्या संख्येने नोकरदारवर्ग वसई-विरार,पालघर, बोईसर तसेच मुंबईत नोकरीनिमित्त प्रवास करतो.

- Advertisement -

हा पूल 1974 साली बांधण्यात आला. पुलाखाली बेसुमार रेती उपसा झाल्याने तो कमकुवत झाला आहे. पुलावरून चर्चगेट डहाणू लोकल, शटल तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या आणि राजधानी एक्स्प्रेसही चालवली जाते.पुलावरील लोखंडी पट्ट्या गंजल्या असल्याने येणार्‍याजाणार्‍यांचा धोका वाढला आहे.

दुसरीकडे रेल्वेगाडीतून निर्माल्य रुपी नारळ खाडीत फेकले जातात. हे नारळ गाडी जाण्याची वाट पाहत असणार्‍या ग्रामस्थांच्या डोक्याला लागून आतापर्यंत अनेजण गंभीर जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत.

- Advertisement -

वर्षभरातील अपघाती मृत्यू
2018 मध्ये पिंट्या नाना मेहेर आणि जितेंद्र पाटील यांचा पूल ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता. 2019 मध्ये रमेश भगत आणि अनुसया भांगरे यांचा पूल पार केल्यानंतर रूळ ओलांडताना मृत्यू झाला होता. तर 1 ऑगस्ट रोजी बेबी भोईर या पुलावरून जाताना खाडीत पडून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांचे दिवस कार्य आटोपून घरी परतत असताना त्यांचे व्याही रमेश माळी यांचा देखील पुलावरून जाताना अपघाती मृत्यू झाला. वर्षाकाठी अशाप्रकारे 15 ते 20 जणांचे बळी या पुलामुळे जात आहेत. त्याप्रमाणे 24 एप्रिल रोजी रोहिणी विक्रांत पाटील आणि 13 मे रोजी वृषाली देवनाथ पाटील या दोघींही पुलाजवळ थांबल्या असताना भरधाव येणार्‍या गाडीतून अज्ञात व्यक्तीने निर्माल्याच्या रुपात फेकलेला नारळ डोक्यात लागून गंभीर जखमी झाल्या होत्या.

रस्ता नसल्याने गावातील तरुण अविवाहित
वाढीव, वैतीपाडा या गावातील घरात मुली देण्यासाठी वधुघरातील मंडळी तयार होत नाहीत. मुलींचे पालक धोकादायक पूल ओलांडून गावात येतात. मात्र परतीचा प्रवास करताना गावात मुलगी देणे सोडाच गावात पुन्हा पाऊल न टाकण्याचे ठरवून जातात. काही पालक तर गावाचे नाव काढताच लागलीच नकार दर्शवितात.

वाढीव गावातील नागरिकांसाठी रेल्वे पुलावरून पर्यायी व्यवस्था व्हायलाच पाहिजे. शिवाय फेरीबोटही तात्काळ चालू करण्यात यावी.
-सतीश गावड, कार्यकारणी सदस्य, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

वैतरणा नदीवरील पूल रहदारीसाठी नाही. वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन नागरीकांना सतर्क राहण्यासाठी फलक लावण्यात आलेले असून गावकर्‍यांना वाहतूक व्यवस्था देण्याचे काम राज्य सरकारचे आहे.
-रवींद्र भास्कर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

गावकर्‍यांना ये-जा करण्यासाठी फेरी बोट सेवा सुरू करण्यासंंबंधी पंचायत समितीस्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत.
-कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -