Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीPoonam Pandey Passed Away: काय आहे सर्व्हायकल कँसर? सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सांगितला...

Poonam Pandey Passed Away: काय आहे सर्व्हायकल कँसर? सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सांगितला उपाय

Subscribe

मुंबई – अभिनेत्री आणि पूनम पांडे हिचं कँसरमुळे निधन झालं आहे. याची माहिती तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. 32 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

पूनम मांडेला सर्व्हायकल कँसर असल्याची माहिती समोर आली आहे. याचा खुलासा पूनमच्या टीमने केला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या पूनमच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या टीमने निधनाचे अधिकृत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, “आजची सकाळ आम्हा सर्वांसाठी संकटाची आहे. आम्हाला हे कळविताना अतिशय दुःख होत आहे की आमची प्रिय पूनमला आम्ही सर्व्हायकल कँसरमुळे गमावले आहे.”

- Advertisement -

काय आहे सर्व्हायकल कँसर?

सर्व्हायकल कँसर हा सर्व्हिक्समध्ये होणारा गंभीर प्रकारातील कँसर आहे. सर्व्हिक्स गर्भाशयाचा सर्वात खालचा भाग असतो, जो योनीशी जोडलेला असतो. सर्व्हायकल कँसरची अधिकाधिक प्रकरणे ही ह्यूमन पेपिलोमाव्हायरसच्या (एचपीव्ही) संक्रमणामुळे होतो. एचपीव्ही एक सामान्य व्हायरस आहे, जो शारीरिक संबंधांदरम्यान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत पसरतो. हा कॅन्सर केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांसाठी गंभीर समस्या बनला आहे.

- Advertisement -

भारतामध्ये सर्व्हायकल कँसरचे प्रमाण वाढले
सर्व्हायकल कँसर महिलांमध्ये वेगाने वाढणारा आजार ठरत आहे. जगतिकस्तरावर महिलांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होत आहे. भारतामध्ये सर्व्हायकल कँसर 18.3% दराने तिसरा सर्वात सामान्य कँसर म्हणून समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार 9.1% महिलांचा सर्व्हायकल कँसरमुळे मृत्यू होत आहे. महिलांच्या मृत्यूचे हे दुसरे प्रमुख कारण ठरत आहे.

अर्थसंकल्पात सर्व्हायकल कँसरबद्दल चिंता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) रोजी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. त्यामध्ये महिलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या सर्व्हायकल कँसरबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
अर्थसंकल्पात सर्व्हायकल कँसर रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्याची घोषणा करण्यात आली. 9 ते 14 वर्षांदरम्यानच्या मुलींचे लसीकरण करुन सर्व्हायकल कँसरचा धोका टाळण्यावर भर देणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामण यांनी म्हटले आहे.

एचपीव्ही व्हॅक्सिन ठरु शकेते उपयोगी

अभ्यासकांचे मत आहे की एचपीव्ही व्हॅक्सिनच्या मदतीने या कँसरचा धोका कमी करता येऊ शकतो. संशोधनात आढळून आले आहे की लसीकरणामुळे एचपीव्ही संक्रमण आणि कँसर होणे 90% पर्यंत टाळता येऊ शकते. एचपीव्ही लसीकरणाची शिफारस सर्वप्रथम 2006 मध्ये करण्यात आली होती. सीडीसीने (रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र) 12 वर्षांपर्यंत नियमीत एचपीव्ही लसीकरणाचा सल्ला दिला आहे. ही लस फक्त सर्व्हायकल कँसरच नाही तर इतरही अनेक गंभीर प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी ठरु शकते.

लस कोणाला घेता येणार?

15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना 6 ते 12 महिन्याच्या अंतराने लशीचे दोन डोस दिले जाऊ शकतात. तर ज्यांचे वय 15 ते 26 वर्षे आहे, त्या वयातील महिलांनी लशीचे तीन डोस घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही लस घ्यावी असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Poonam Pandey Death : मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -