हिंगोली : पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेला वाद आणि रुसवाफुगवी कमी झालेली दिसत नाही. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षातील एक मोठे नेते दुसऱ्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपद दिल्यानं नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशी उघड-उघड नाराजी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यासह वरिष्ठांना जाब विचारणार आहे, असंही मंत्र्यांनी म्हटले आहे.
ते मंत्री आहेत, नरहरी झिरवाळ. नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. तसेच, झिरवाळ यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद आहे. अजितदादांच्या बऱ्याच मंत्र्यांना स्व:जिल्ह्यातील पालकमंत्रिपद देण्यात आली नाहीत. त्यामुळे अजितदादांचे अनेक मंत्री नाराज आहेत. यात हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहेत. त्यातच झिरवाळ यांनीही मिश्किलपणे बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : छावा चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; म्हणाले, एका दृष्यात…
हिंगोलीचे पालकमंत्रिपद मिळाल्याबाबत वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून झिरवाळ यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे, अशी खदखद झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे.
झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
“मी पहिल्यांदा मंत्री झालो. पहिल्यांदा पालकमंत्री झालो. मला इथे आल्यावर समजलं की, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. आता मुंबईला गेल्यावर वरिष्ठांना विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला?” असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पाच दिवसात थंडी वाढणार की उन्हाचा चटका बसणार? हवामान विभागानं काय दिला इशारा?