घरताज्या घडामोडीPorn Film Case: राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांची वाढ, बेटींग प्रकरणी...

Porn Film Case: राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांची वाढ, बेटींग प्रकरणी होणार सखोल चौकशी

Subscribe

अश्लील फिल्म प्रकरणात राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्रा याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांची वाढ केली आहे. अश्लील फिल्म बनवून विकल्या आणि मिळालेल्या पैशातून बेटींग केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या दोन बॅंक अकाउंटचीही पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन थॉर्प यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

उद्योगपती राज कुंद्रा याच्यावर पॉर्न फिल्म बनवून विकण्याचा आरोप करण्यात आला आहे. राज कुंद्रा वेगवेगळ्या डीजिटल अॅप्सच्या माध्यमातून अश्लील फिल्म्स विकत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई गुन्हे शाखेनं राज कुंद्रा याला अटक करुन सखोल चौकशी सुरु केली आहे. राज कुंद्रासह अन्य ९ जणांनाही अटक करण्यात आले आहे. कुंद्राला शुक्रवारी २३ जुलै रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात पोलिसांनी चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागिती होती यावर न्यायालयाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

राज कुंद्रा आणि रायन थॉर्पने पॉर्न फिल्म उद्योग करुन कमावलेला पैसा बेटींगमध्ये वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राचे येस बँकमधील अकाउंट आणि युनियन बँक ऑफ आफ्रिका या दोन बँकेतील अकाउंटमधील व्यवहाराची पडताळणी करण्यात येणार आहे. राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामुळे राज कुंद्राच्या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोर्टात राज कुंद्राचा जबाब

अश्लील चित्रपट निर्मिती करुन अॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक केली आहे. राज कुंद्राने कोर्टात आपली भूमिका वकिल पोंडा यांच्या माध्यमातून मांडली आहे. पोंडा यांनी म्हटलं आहे की, राज कुंद्रा यांनी निर्माण केलेल्या कंटेंटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. फक्त हा कंटेंट अश्लील प्रकारामध्ये मोडतो. यामुळे राज कुंद्रा यांच्यावर कारवाईदरम्यान माहिती तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावले आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठवण्यासंदर्भात गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो असा दावा वकिल पोंडा यांनी केला आहे. तसेच प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवतानाचे चित्रीकरण केल्यास ते कायदेशीर भाषेत पॉर्न असे म्हटलं जाईल असा युक्तीवाद पोंडा यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -