Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम Porn Films Case : राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Porn Films Case : राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Related Story

- Advertisement -

पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन याला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचं मुंबई पोलिसांच्या लक्षात आलं होतं. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. दरम्यान, आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रायन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज न्यायालयात राज कुंद्रा यांच्यावतीने जेष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमे जामीन मिळण्यासारखी आहेत त्यामुळे कुंद्रा यांना कोठडी देऊ नये असा युक्तीवाद कुंद्रा यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या गुन्ह्यात बरचसे फॉरेन ट्रांजेक्शन सापडलं असल्याने ते तपासण्यासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय आमचा तपास पूर्ण होणार नाही, असं मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. गहना वशिष्ठ आणि वंदना तिवारी यांच्यासोबत कुंद्रा यांच्या कंपनीने जे कॉन्ट्रॅक्ट केले होते ते आम्हाला पडतळायचं आहे, असं मुंबई पोलीस म्हणाले. राज कुंद्रा या गुन्ह्यात मास्टरमाईंड आहे त्यानेच हा गोरखधंदा सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -