‘या’ मुद्द्यांवर अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (Monsoon Session) सुरु होणार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

Assembly Speaker's election postponed

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (Monsoon Session) सुरु होणार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे यांसह अनेक मुद्द्यांवर आज अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (possibility of a fight between the opposition and the ruling party in the session on these issues)

राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे.

अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे

 • मुसळधार पावसाने केलेले शेतीचे नुकसान
 • राज्यातील पूरपरिस्थिती
 • रखडलेले प्रकल्प
 • वादग्रस्त आमदार आणि मंत्री
 • राज्यावरचे कर्ज
 • मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
 • राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ

17 ते 25 ॲागस्टपर्यंत अधिवेशन

 • 17 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.
 • या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे.
 • 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत.
 • 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे. तसेच, अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे. सत्तेत असताना महाविकास आघाडीची एकजूट आता विरोधी पक्षात आल्यावरही कायम असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते आहे.


हेही वाचा –