Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; CSIRचे भाकित

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; CSIRचे भाकित

पुढील वर्षभर नागरिकांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे, असे CSIRचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या कोरोना दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आज राज्यात मिनी लॉकडाऊन आणि विकेंडला लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पण यादरम्यानच आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार, असे भाकित CSIRचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे पालन करणे सोडल्याने राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुढील वर्षभर नागरिकांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे, असे CSIRचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले.

- Advertisement -

पुढे शेखर मांडे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट तीव्र असल्यामुळे कोरोनाचा जास्त प्रमाणात फैलाव होत आहे. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी तीव्र लाट सुरू आहे. या लाटेचा जो स्ट्रेन आहे, तो तितकाच भयानक आहे. अजूनही या महामारीचा अंदाज आलेला नाही आहे. रुग्णांची संख्या काही काळासाठी कमी होणे, याचा अर्थ कोरोना संकट संपलं असा होत नाही. एक लाट ओसरली तर पुढील लाट येण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढची लाट थोपवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक अशा दोघांकडून प्रयत्न होणे खूप आवश्यक आहे. लॉकडाऊननंतर सर्व काही लगेच खुले करण्यात आले आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू केले. पण याचे परिणाम काय होऊ शकतात याचे दर्शन महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – Coronavirus Updates: देशात कोरोनाचा तांडव! पहिल्यांदाच २४ तासांत १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची


- Advertisement -

 

- Advertisement -