Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट पुणेकरांनो सावधान! मुंबईनंतर पुण्यातही कन्टेन्मेंट झोनची शक्यता

पुणेकरांनो सावधान! मुंबईनंतर पुण्यातही कन्टेन्मेंट झोनची शक्यता

पुण्यात सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणे कोरोनाचे हॉट्सपॉट ठरत आहेत. अनेक ठिकाणी कंन्टेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. बिनधास्त झालेल्या मुंबईकरांवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईनंतर आता पुण्यात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाचे चित्र समोर येत आहे. पुण्यात सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. याभागात संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा महापालिकेच्या आढावा बैठकीत देण्यात आला.

पुण्यात मागील आठवड्यात कोरोनाचा ४.६ टक्के पॉझिटिव्ह दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन प्रशासनाला विविध सूचना केल्या. संसर्ग वाढत असला तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

उपचार सुरु असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची कमी होणारी संख्या गेल्या १० – १२ दिवसांपासून वाढू लागली आहे. सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढताना दिसत आहे. संसर्ग वाढला तर या भागांत पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे महापौरांनी सांगितले. सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला तरी मोठी खबरदारी घेत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. सध्या शहरात १७ स्वॅब सेंटर सुरू आहेत. दिवसाला ३०००-३५०० हजार स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा – हिंगणघाटमधील निवासी शाळेत ७५ विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात

- Advertisement -

 

- Advertisement -