घरताज्या घडामोडीkartiki Ekadashi 2021: यंदा पंढरपूरात कार्तिकी वारी होण्याची शक्यता, महापुजेला उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण...

kartiki Ekadashi 2021: यंदा पंढरपूरात कार्तिकी वारी होण्याची शक्यता, महापुजेला उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देणार

Subscribe

कार्तिकी एकादशी कोरोनाचे सर्व नियम पाळून व्हावी अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे

विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून यंदा पंढरपूरात विठ्ठलाची कार्तिकी वारी होण्याची शक्यता आहे. येत्या १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. पंढरपूरातील कार्तिकी वारी ही अवघ्या महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो. कार्तिकी वारीच्या नियोजनासाठी बुधवारी बैठक होणार आहे. पंढरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून विठूरायाच्या महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद केलेली मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने यंदाची कार्तिकी वारी होण्याची शक्यता आहे.

येत्या १५ नोव्हेंबरला येणारी कार्तिकी एकादशी कोरोनाचे सर्व नियम पाळून व्हावी अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे आणि या मागणीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याने प्रशासन वारीसाठी प्रयत्नशील असल्याचे पहायला मिळत आहेत. कार्तिकी वारीच्या निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी यंदा कार्तिकी वारी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या सावटामुळे मागील दोन वर्ष पंढरपूरातील आषाढी तसेच कार्तिकी वारी झाली नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाले असून सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करुन वारीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पंढरपूर हे वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी असलेले प्रमुख स्थळ आहे. मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त याठिकाणी वारीसाठी येत असतात. त्यामुळे पंढरपूरात प्रचंड गर्दी पहायला मिळते याचपार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून पंढरपूरात संचारबंदी करण्यात आली होती. मात्र आता राज्यातील लसीकरणाला देखील जोर आला असून पंढरपूरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.


हेही वाचा – Vaccination : लसीचे दोन डोस घेतलेल्या अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -