घरताज्या घडामोडीपुण्यातील लॉकडाऊन अंशत: उठणार?

पुण्यातील लॉकडाऊन अंशत: उठणार?

Subscribe

पुण्यातील लॉकडाऊन अंशत: उठविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. या शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले देखील उचलली आहेत. मात्र, असे असताना देखील येत्या ३ मेला पुण्यातील लॉकडाऊन अंशत: उठविण्यात येणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, जास्त रुग्ण असलेल्या रेड हॉटस्पॉट भागातील नियंत्रण कडक ठेवणार असून तेथील वैद्यकीय तपासणी वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे कोरोनाच्या संसर्गात आघाडीवर

पुणे कोरोनाच्या संसर्गात देखील आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. देशात २३ चाचण्यांमधून कोरोनाचा सरासरी एक रुग्ण आढळत असताना पुण्यात मात्र, नऊ चाचण्यांवर कोरोनाचा एक रुग्ण आढळून येत आहे. पुण्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा वेग हा ७ दिवसांचा आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची लवकरात लवकर माहिती घेऊन त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजेत, अशा उपाययोजना केंद्रीय पथकाने (IMCT) सुचवल्या आहेत.

- Advertisement -

याबाबत केंद्रीय पथकाने केली चर्चा

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, स्थलांतरीत मजुरांचा परिसर, भाजीपाला मार्केट, रेशन दुकाने, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष आणि रुग्णालयाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने राज्य सरकारला काही सूचना केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय पथकाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली आहे.


हेही वाचा – चार महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -