घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद समर्थनार्थ MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे पोस्टर, नव्या वादाला सुरुवात

औरंगाबाद समर्थनार्थ MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे पोस्टर, नव्या वादाला सुरुवात

Subscribe

नामांतराविरोधात एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे उपोषण सुरू असतानाच काही तरुण हे औरंगजेबाचे पोस्टर घेऊन उपोषणस्थळी दाखल झाले. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु या नामांतराच्या विरोधात जलील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी चक्क औरंगजेबाचे फोटो घेऊन जल्लोष साजरा केला. कोणीतरी आंदोलन खराब करण्यासाठी काही लोकांना फोटो देऊन पाठवलं, पण आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

- Advertisement -

फोटो पाहून काही तरुणांनी ‘झिंदाबाद झिंदाबाद, औरंगाबाद झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता याठिकाणी जल्लोष सुरु झाला. मात्र, यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसेने नामांतराच्या समर्थनार्थ आज स्वाक्षरी मोहीम राबवली.

काय म्हणाले जलील?

- Advertisement -

औरंगाबादचं नाव हे औरंगाबादच ठेवावं, अशी येथील लोकांची तीव्र भावना आहे. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकरण करत नाही आहोत. हे माझं शहर असल्यामुळे त्यासोबत माझी भावना जोडली गेली आहे. ही लोकशाही आहे, तुमची हुकुमशाही नाही, अशी प्रतिक्रिया देत इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपकडून उद्धव ठाकरेंना सवाल

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करुन औरंगाबाद नामांतराविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्राची मंजूरी मिळाली आहे. त्यानंतर शहरात नामांतराविरोधात आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील करत आहेत. त्यावरुन बावनकुळेंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे, की तुम्ही यावर काही बोलणार की गप्प राहाणार आहे.

 


हेही वाचा : औरंगाबाद नामांतराविरोधात MIMचं साखळी उपोषण; तर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -