Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रPoster War : बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी अन् पोस्टर वॉरवरून दोन्ही शिवसेनेत जुंपली

Poster War : बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी अन् पोस्टर वॉरवरून दोन्ही शिवसेनेत जुंपली

Subscribe

शिवसेना शिंदे गटाने एका वृत्तपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा आशय त्या जाहिरातीत आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे.

मुंबई : आज (शनिवार) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. मुंबईत शिंदे गट आणि उद्धव गटांमध्ये पोस्टर वॉरवरून सध्या वाद सुरू आहे. शिंदे गटाने एका वृत्तपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा आशय त्या जाहिरातीत आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. (Poster war on the death anniversary of balasaheb thackeray.)

हेही वाचा : राज्य नाट्य स्पर्धेत २८ नाटकांची मेजवानी; २७ नोव्हेंबरपासून पसा नाट्यगृहात दररोज होणार सादरीकरण

- Advertisement -

या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या या जाहिराती मुंबईभरात लावण्यात आल्या आहे. त्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा एक मोठा फोटो असून त्यामध्ये एक वाक्य देण्यात आले आहे. मी माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही, अशा आशयाचे ते वाक्य आहे.

हेही वाचा : NCP Vs NCP : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले; काय आहे कारण

- Advertisement -

यावरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. शिवसेना शिंदे गटाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. त्यांनी नेहमी इंदिरा गांधी, राजीव गांधींना राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात कायम एकोपा राहिल याची त्यांनी काळजी घेतली. (Poster war on the death anniversary of balasaheb thackeray.)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -