घरमहाराष्ट्रठाणे ते रायगडपर्यंत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंचा फोटो कुठंय?

ठाणे ते रायगडपर्यंत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंचा फोटो कुठंय?

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० हून अधिक आमदार आहेत. तर आणखी ८ आमदार मुंबई सोडून गेले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ३ तर अपक्ष ५ आमदार आहेत. अशा स्थितीत शिवसेनेचे दोन तृतीयांश संख्याबळ यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.

सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात येत आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत नाहीये. ठाणे, रायगडमधील कार्यकर्तेही शिंदे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा फोटो कुठंय?

ठाकरे घराण्याविरुद्ध बंड करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते सर्वाधिक प्रमाणात दिसत आहेत. ठाकरे कुटुंब की शिवसेना विरोधी असलेले पोस्टर फाडले जात आहेत. परंतु ठाणे, रायगडमधील विविध भागातील पोस्टर्स एक वेगळीच कथा सांगत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत नाहीये. यामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचेच फोटो दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा फोटो कुठंय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा : अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, शिंदे गट कोर्टात धाव घेण्याची शक्यता

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -