घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात बदनामीकारक पोस्ट करणे पडले महागात; विद्यार्थी अटकेत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात बदनामीकारक पोस्ट करणे पडले महागात; विद्यार्थी अटकेत

Subscribe

आरोपीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबतही ट्विटरवर अपशब्द वापरले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी गणेश गोटे या आरोपीला अटक केली.

राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणं हे एका विद्यार्थ्याला भोवले आहे. दरम्यान मुख्यमंत्री (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री (dcm devendra fadanvis) यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट केलेल्या विद्यार्थ्याला अहमदनगरमध्ये (ahamdnagar)अटक करण्यात आली आहे. आरोपी असलेल्या विद्यार्थ्याला औजारंगाबादहुन मुंबईत (mumbai) आणून स्थानिक कार्यालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्ययार्थ्यांचे नाव गणेश नारायण गोटे (ganesh narayan gote) असून तो 29 वर्षांचा आहे. अहमदनगर मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. दरम्यान या आरोपीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबतही ट्विटरवर अपशब्द वापरले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी गणेश गोटे या आरोपीला अटक केली.

- Advertisement -

ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (dcm devendra fadanvis) , महिला खासदार आणि महिला पत्रकार यांच्याविषयी मजकूर लिहिताना यात आक्षेपार्ह शब्द वापरात तो प्रसारित केल्याने 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सायबर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शोध घेऊ नये, यासाठी आरोपीने सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट, व्हीपीएनचा यांचा वापर करुन अपशब्द असलेला मजकूर प्रसारित केला होता.

दरम्यान असे असूनही महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अहमदनगर येथील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी मुंबईतही आणण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर गणेश गोटे याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी दोन मोबाइल, एक लॅपटॉप जप्त केले. दरम्यान लॅपटॉप आणि मोबाइल यांचीही तपासणी सुरु आहे. संशयित व्यक्तीने प्रसारित केलेला माजुकूर कुणाकुड लिहून घेतला आहे का याचासुद्धा पोलीस तपास घेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान न्यायालयाने या आरोपीला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, यशस्वी यादव, पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


हे ही वाचा –  औरंगाबादमध्ये धावणार मेट्रो; 6 हजार 800 कोटींच्या खर्चासह अंतिम आराखडा तयार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -