घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर पोलीस पदोन्नतीच्या बदल्यांना स्थगिती; आघाडी सरकारमधील गोंधळ उघड

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर पोलीस पदोन्नतीच्या बदल्यांना स्थगिती; आघाडी सरकारमधील गोंधळ उघड

Subscribe

राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या काल, बुधवारी झाल्या होत्या. मात्र या बदल्यांवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती दिली आहे.

मुंबई : गृह विभागाने बुधवारी जारी केलेल्या पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली आहे. शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच बदलीच्या आदेशाला स्थगिती दिलेले पाचही पोलीस अधिकारी ठाणे जिल्ह्याशी संबंधित आहेत.

राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या काल, बुधवारी झाल्या होत्या. मात्र या बदल्यांवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती दिली आहे. त्यामध्ये महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला स्थगिती मिळाली आहे.

- Advertisement -

गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहीने होत असतात. त्यामुळे स्वपक्षीय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हातील बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता संमती कशी दिली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. ते शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेत आहेत. त्यामुळे त्यांची नाराज नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी ५ बदल्यांना स्थगिती दिल्याचे कळते.

स्थगितीबद्दल खुलासा करा : फडणवीस

दरम्यान, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होण्याच्या अवघ्या १२ तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्यांचे आदेश परत घेण्यामागे नेमके काय कारण आहे? ही प्रशासकीय चूक आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

याआधी दहा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यानंतर त्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बदली घोटाळ्याची चौकशी सुरू असून, तो वसुलीचा भाग असल्याचे देखील तपासात समोर आले होते. आता हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याने याचा खुलासा झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्त महेश पाटील, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, ठाणेचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले आणि पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे


हेही वाचाः वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग होणार, विजेच्या वापरात काटकसर करा – नितीन राऊत

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -