घरताज्या घडामोडीमहापालिकेची बेफिकरी; अपघातांना आमंत्रण

महापालिकेची बेफिकरी; अपघातांना आमंत्रण

Subscribe

मुंबईसह राज्यभरात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने सखल भागांत पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते आहे. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ते अपघातांची शक्यता वाढली आहे.

मुंबईसह राज्यभरात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने सखल भागांत पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते आहे. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ते अपघातांची शक्यता वाढली आहे. मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर असाच एक मोठा खड्डा तयार झाला असून, हे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे झाले आहे. (pothole on mumbai wadala road due to heavy rainfall)

वडाळा येथील पाच गार्डन परिसराबाहेरील मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते. या रस्त्यावर डांबर भरून खड्डा भरण्यात आला होता. मात्र, या खड्ड्यातील डांबर पाणी साचल्याने बाहेर आले असून, रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता अधिक आहे.

- Advertisement -

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला असून रस्त्यांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील इतर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व विभाग अलर्ट असून समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांनी आपआपली तयारी काय काय़ आहे हे बैठकीत सांगितली आहे. याशिवाय ज्या काही इजन्सी आहेत त्यांच्या टीम देखील वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत.

अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचे नुकसान होणार नाही. दरड कोसळून दुर्घटनेची ठिकाणं ट्रॅक केली आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह, काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.


हेही वाचा – कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, पंचगंगेची पातळी २५ फुटांवर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -