घरठाणेपाऊण तासानंतर राज्यपालांच्या कार्यक्रमातील वीजपुरवठा सुरळीत; मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत

पाऊण तासानंतर राज्यपालांच्या कार्यक्रमातील वीजपुरवठा सुरळीत; मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत

Subscribe

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील स्काऊट गाईड हॉलमध्ये 'स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचे' आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच येथील बत्ती गुल झाली होती.

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील स्काऊट गाईड हॉलमध्ये ‘स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच येथील बत्ती गुल झाली होती. दरम्यान, सद्यस्थितीत वीज पुरवठा सुरळीत झाला असून, स्काऊट गाईड हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.

दादर परिसरात सकाळी 10:15 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळं शिवाजी परिसरातील ही वीजपुरवठा खंडीत झाला होता. जवळपास पाऊण तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, राज्यपालांचा कार्यक्रम असल्यानं प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दुर करत वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

- Advertisement -

स्काऊड गाईडचा हा पुरस्कार सोहळा मागील दोन वर्ष झाला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला नव्हता. मात्र आता तब्बल दोन वर्षानंतर स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्यक्रम पार पडणार असल्याने प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला.

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने मंगळवारी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती दिली. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसहीत उपनगरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या ४०० केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. हा बिघाड झाल्याने आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास मुंबई व ठाणे डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

- Advertisement -

कळवा पडघा येथील वीजपुरवठा केंद्रामध्ये हा बिघाड झाला आहे. त्यामुळे दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर भागांमधील वीजपुरवठा खंडित झालाय. ठाणे आणि कळव्यामध्येही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांमध्ये टप्प्याटप्प्यांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु आहे.

महापारेषणच्या पडघा येथील उच्च दाब वीजवाहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवली, कल्याण. बदलापूर, अंबरनाथ शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कुर्ला, चेंबूर, वाशीसहीत पालघरमधील संपूर्ण विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.


हेही वाचा – भाजपा नेते किरीट सोमय्या बोगस FIR विरोधात तक्रार करणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -