घरमहाराष्ट्रवेटलिफ्टर वैभवीची आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या

वेटलिफ्टर वैभवीची आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या

Subscribe

आर्थिक परिस्थिती आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संधी मिळत नसल्याने नैराश्येतून वेटलिफ्टर वैभवी पाटेकरने आत्महत्या केली आहे. गोरेगाव येथील विष्णू तलावात वैभवीचा मृतदेह सापडला.

रायगडमध्ये जिल्ह्यातील राज्यस्तरीय वेटलिफ्टरने आत्महत्या केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या १९ वर्षाच्या वैभवी पाटेकर हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक परिस्थितिला कंटाळून तसंच करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संधी न मिळाल्याने नैराश्येत येऊन वैभवीने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

तलावात सापडला मृतदेह

वैभवी पाटेकर सोमवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. वैभवी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे कुटुंबियांसोबत राहत होती. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला अखेर मंगळवारी रात्री तिचा मृतदेह गोरेगाव येथील विष्णू तलावात सापडला. त्यानंतर वैभवीने आत्महत्या केल्याचे उघड झाले. वैभवीच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभवीच्या आत्महत्येबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

आईकडून घेतले वेटलिफ्टिंगचे धडे

वैभवीने तिची आई ज्योतिक पाटेकर हिच्याकडून पॉवर लिफ्टिंगचे धडे गिरवले होते. वैभवीची आई देखील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. या दोघी मायलेकींनी रागडचे नाव उंचावले आहे. दोघींनी देखील तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली होती. वैभवीने राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. वैभवीचे गावकरी देखील तिला खूप मदत करायचे. कुटुंबियांकडून आणि गावकऱ्यांकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र वैभवीची घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे तिला वेटलिफ्टिंगमध्ये पुढे जाण्याची संधी मिळत नव्हती.

वेटलिफ्टिंगमध्ये करायचे होते करिअर

वैभवीची आई ज्योतिका पाटेकर हि लोणेरे येथे दाबेलीची गाडी चालवून कुटुंबाचा गाडा चालवते. तर वैभवीचे वडील गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. वैभवीला वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करायचे होते. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला पुढे जाण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या सगळ्याला कंटाळूनच वैभवीने आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -