घरCORONA UPDATECoronaVirus: बेळगावात बनणाऱ्या पीपीई किट्सला होतेय राज्यभरातून मागणी

CoronaVirus: बेळगावात बनणाऱ्या पीपीई किट्सला होतेय राज्यभरातून मागणी

Subscribe

कोरोनाशी लढताना डॉक्टर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी, परिचारिका वारंवार एका गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत. ते म्हणजे पीपीई किट्स आणि मास्क. आता आपल्या राज्यातच पीपीई किट्सची निर्मिती केली जात आहे. बेळगावात बनवण्यात येणाऱ्या पीपीई किट्सना राज्यभरातून मागणी येत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यही पीपीई किट्सची निर्मिती करत आहेत. सध्या पीपीई किट्सचा तुटवडा जाणवत असून डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाकडून याची मागणी वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना हे पीपीई किट्स सुरक्षा कवच म्हणून काम करते. त्यासाठी बेळगावातील टीडी ग्रुप कंपनीने उत्कृष्ट दर्जाच्या वॉशेबल पीपीई किटची निर्मिती केली आहे.

हेही वाचा – व्होडाफोन-आयडियाचे तीन नवे डबल डेटा प्लॅन्स; जाणून घ्या डेटाची माहिती

- Advertisement -

ही कंपनी बनवतेय पीपीई किट्स 

पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन किटची कोरोना रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना आवश्यकता असते. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या बेळगावातील एका कंपनीत वॉशेबल पीपीई किटची निर्मिती करण्यात येत आहे. वडगावमधील टीडी ग्रुप कंपनीचे मालक भरतेश उपाध्ये यांनी वॉशेबल पीपीई किटची निर्मिती सुरू केली आहे.

कसे बनते पीपीई किट

या कंपनीत पॉलीप्रॉपीलिन कपड्याचा वापर करून पीपीई किट तयार केले जात असून यामध्ये वन पीस पीपीई सूट, कॉटन फेस मास्क, प्लास्टिक फेसशिल्ड फिट कव्हर यांचा त्यात समावेश होतो. या कंपनीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, जिल्हा पंचायत सीईओ डॉ. राजेंद्र यांनी भेट दिली असून जिल्हा रुग्णालयाला हे पीपीई किट पुरवण्यास सांगितले आहे.

हे टप्पे महत्त्वाचे

  • पीपीई किटच्या निर्मितीसाठी अत्यंत उच्च दर्जाच्या पॉलीप्रॉपीलिन कपड्याचा वापर होतो
  • केवळ ४५० ग्रॅम इतके या किटचे वजन असते
  • कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हे पीपीई किट म्हणजे सुरक्षा कवच
  • हे किट पंधरा वेळा धुवून वापरता येते
  • पंधरा वेळ धुतल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना तपासताना हे किट वापरू शकतात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -