घरमहाराष्ट्रप्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणारा म्हणतो...; आता सोडा, संध्याकाळी परत येतो

प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणारा म्हणतो…; आता सोडा, संध्याकाळी परत येतो

Subscribe

महेंद्र डोंगरदिवे असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. आपण काहीच केले नाही, असे महेंद्र वारंवार पोलिसांना सांगत आहे. मला बकऱ्या चरायला जायंचय. आता सोडा. मी संध्याकाळी परत येतो, अशी मागणीही महेंद्रने पोलिसांकडे केली. नेमके काय कृत्य केले हेही महेंद्र पोलिसांना सांगत नाही. पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जाणार आहेत.

 

हिंगोलीः कॉंग्रेसच्या विधानपरिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांकडे अजब मागणी केली. साहेब मला बकऱ्या चारायला जायचंय, आता जाऊ द्या, संध्याकाळी परत येतो, अशी मागणी त्या आरोपीने पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले. केलेल्या कृत्याचा आरोपीला पश्चाताप नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले.

- Advertisement -

कसबे दवंडा गावात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा या हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्याची माहिती देताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कसबे दवंडा या गावात असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आली. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आली, मला त्या व्यक्तीने ओढलं आणि माझ्यावर हल्ला केला. तेथे असलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

महेंद्र डोंगरदिवे असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. आपण काहीच केले नाही, असे महेंद्र वारंवार पोलिसांना सांगत आहे. मला बकऱ्या चरायला जायंचय. आता सोडा. मी संध्याकाळी परत येतो, अशी मागणीही महेंद्रने पोलिसांकडे केली. नेमके काय कृत्य केले हेही महेंद्र पोलिसांना सांगत नाही. पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जाणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आज माझे पती राजीव या जगात नाहीत. माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या जनतेसाठी काम करत राहणार आहे. कारण राजीव यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरूच ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता, असा दावा आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -