Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, जयंत पाटील भावनिक... प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, जयंत पाटील भावनिक… प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेहमी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये येत असतात. तसेच ते नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत असतात. नेहमीप्रमाणे शरद पवार आजही वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आले. त्यानंतर त्यांनी अनेक मान्यवरांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणत्याही प्रकारची बैठक नव्हती. कोणतेही नेते मंडळी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी आले नव्हते म्हणजे तथाकथित आज बैठक घेण्यात आली. परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले.

राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर विविध प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. जयंत पाटलांचा कुठलाही नाराजीचा सूर नाहीये. ते किती भावनिक होते हे तुम्ही पाहिलयं. तसेच त्यांनी उद्गार देखील काढले होते. ते त्यांच्या कारखान्याच्या कामासाठी पुण्याला गेले होते असं म्हणत पटेल यांनी जयंत पाटलांबाबत स्पष्टीकरण दिलं. मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, आमचा पक्ष एक आहे आणि एकच राहिलं, राष्ट्रवादीत कोणताही अंतर्गत कलह नसल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर मला दोन ते तीन दिवस विचार करण्यासाठी वेळ द्यावा, असंही पवार म्हणाले होते. परंतु त्यांच्या मनात नेमकं काय आहे?, याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवता, त्यांना शांततेने विचार करू द्या. मात्र, उद्या पुन्हा एकदा आम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर जी काही अधिकृत माहिती समोर येईल, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.


हेही वाचा : पवारांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा; बावनकुळे म्हणाले, कोणी पक्षात येत असेल तर स्वागत


- Advertisement -

 

- Advertisment -