घरमहाराष्ट्रसरकारमध्ये तीन पक्ष एकत्र, पण पक्षासाठी जे करायचं ते काँग्रेसनं करावं -...

सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र, पण पक्षासाठी जे करायचं ते काँग्रेसनं करावं – प्रफुल्ल पटेल

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल नाराजी व्यक्त करताना काँग्रेसला जे करायचं ते करु द्या, आम्ही कोणाला बांधून ठेवलेलं नाही, असं म्हटलं. तसंच, काँग्रेसचा काय अजेंडा आहे, हे त्यांनाच विचारा, असं देखील पटेल म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे त्यांनाच विचारा. शरद पवार महाविकास आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चालू आहे. महाविकास आघाडीचं काम शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून यापुढेही राहील. बाकिचे काय बोलतात यावर दररोज खुलासा करण आम्हाला योग्य वाटत नाही. एच. के पाटील, मल्लिकार्जुन खरगे,चव्हाण, थोरात वेगवेगळं बोलतात, कशावर व्यक्त व्हावं. त्यांच्या वक्तव्याने काही फरक पडत नाही आहे. मीडिया इव्हेंट झाला आहे. कोणाला काय करायचं ते करु द्या आम्ही कोणाला बांधून ठेवलेलं नाही. ज्या पक्षाला जे करायचं ते करु द्या आम्ही का उत्तर देऊ?” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

- Advertisement -

ठएच.के.पाटील हे प्रभारी आहेत, ते काय म्हणतात याला मी जास्त महत्व देतो. त्यामध्ये जास्त तथ्यं असतं कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघेही शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. याचा अर्थ काय? आता इशारा तुम्हाला माहितीच आहे,” असं देखील पटेल म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -