भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद हे पवार हे पुन्हा एकदा पक्षाची मोर्चेबांधणी करण्याकरिता राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी पक्षातील काही आमदारांना सोबत घेवून बंड केले आणि राज्याच्या राजकारणात आणखी एकर मोठा भूकंप घडला. त्यानंतर आता शरद पवारांनी वयाच्या 82 व्या वर्षी एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. मोर्चे बांधणी करण्यासाठी शरद पवारांनी नाशिकमधील येवला येथून सुरुवात केली. येवल्यामधून जाहीर सभा घेवून शरद पवारांनी अजित पवार गटाला आव्हान देण्यास सुरुवात केले आहे. त्यांची दुसरी सभा ही बीड येथे झाले असून आता कोल्हापूरमधील सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर कोल्हापुरातील सभा झाल्यानंतर त्यांची त्यानंतरची सभा ही भंडारामध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Praful Patel’s criticism of Sharad Pawar’s meeting)
हेही वाचा – पत्रकारांवरील हल्ले निंदनीय, हल्लेखोरांना शासन झालेच पाहिजे : राज्यपाल
भंडारा हा जिल्हा एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू असलेले नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पटेल यांनी त्यांना पाठिंबा देऊन सर्वांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता शरद पवार लवकरच भंडारा जिल्ह्यात सभा घेणार असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या सभेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी याबाबत चर्चा करण्यात येत आहे. परंतु या सभेवरून आता प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. तर त्यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या सुचनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या मोठ्या भूकंपानंतर प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. यासाठी कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार हे भंडाऱ्यात आले तर मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तसेच त्यांची सभा झाली तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेला गर्दी करावी, अशा सूचना त्यांनी केल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार आपल्या जिल्ह्यात आले तर, मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांचे स्वागत करू. त्यांच्या सभेला आपल्याशिवाय कोणीही गर्दी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आपण आवर्जून जाऊ. भाषणात माझ्याविरुद्ध बोलले तरी ते ऐकून घेऊ, अशी उपरोधिक टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रवादी पक्ष हा आपलाच आहे. पक्षात गटतट नाही. घड्याळ आपलीच असून कुणाच्याही मनात शंका नको असा दावा करत ते म्हणाले की, आयुष्यात सर्वांना कधी ना कधी महत्वाचा निर्णय घ्यावे लागतात.
शरद पवार नेते होते, आहे आणि राहणार. त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही. तात्पुरती नाराजी असेल. त्यामुळे दुरावा असेल. आम्ही घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घेतलेला आहे. शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबत राहू. राजकीय परिस्थिती, राज्याच्या विकाससाठी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही बाळ राहिलो नाही, अशी खोचक टीका देखील प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षात असताना काम करताना अडचणी आल्या. त्यामुळे सत्तेत गेलो. राष्ट्रवादीचे 54 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार यामुळे शिवसेना सत्तेत आली. वैचारिकरित्या आपल्यासोबत होती. तेव्हा शिवसेना चालली. मग आता शिवसेनाच आहे, हे का नाही चालत?, असा प्रश्न देखील यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.
आज हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने भारावून गेलो.
भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांशी माझे कौटुंबिक नाते आहे. शेतकरी,… pic.twitter.com/24JC887Ytz
— Praful Patel (@praful_patel) August 23, 2023