घर महाराष्ट्र नागपूर 'राष्ट्रवादी'ला मुख्यमंत्री पद देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे... प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

‘राष्ट्रवादी’ला मुख्यमंत्री पद देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे… प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

Subscribe

नागपूर – एकीकृत शिवसेना (Shivsena) आणि भारतीय जनता पक्षाची (BJP) युती ही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुटली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जेव्हा हीच मागणी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केली तेव्हा त्यांनी मौन धारण केले. शिवसेनेचा एकही नेता त्यावर बोलायला तयार नव्हता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला आहे.

अजित पवार गटाचा विदर्भातील पहिला संकल्प मेळावा शनिवारी येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. अजित पवार गटाने यावेळी शक्तीप्रदर्शन करत 43 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत का सहभागी झाला त्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शिवसेनेकडे तेव्हा 56 आमदार होते तर आपल्याकडे 54. याआधारावर राष्ट्रवादीला अडीच नाही तर किमान दोन वर्षांसाठी तरी मुख्यमंत्रीपद अपेक्षित होते. यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी गेलो होतो. मात्र ते या प्रस्तावावर काहीही बोलले नाही. या बैठकीवेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील उपस्थित होते. मात्र कोणीही काहीही बोलल नाही. राष्ट्रवादीला अनेकवेळा मुख्यमंत्रीपदाची संधी आली. मात्र प्रत्येकवेळ आपण गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले. आपल्याला (राष्ट्रावादी काँग्रेस) ठराविक जागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार का घ्यायची, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का?” असा सवाल त्यानी केला. भाजपकडून आपल्याला न्याय मिळणार आहे. यापुढे पक्षाला अधिक बळकट करायचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर बोलण्याचे मात्र टाळले.

- Advertisement -

हेही वाचा :महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; पुढील चार-पाच दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाचा अंदाज

‘पक्षाचे नाव, चिन्हाची चिंता नाही”

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘पक्षाचे नाव आणि चिन्हाची चिंता करु नका. आपल्यासोबत 43 आमदार सध्या आहेत, आणखी आमदार सोबत येतील. त्यामुळे निवडणूक चिन्ह आणि पभाचे नाव याबद्दल निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैरोजी अजित पवारांनी बंडखोरी करत ते आठ आमदारांसह महायुती सामिल होत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम होता. नागपूर आणि काटोल मतदारसंघावरुनही त्यांनी यावेळी भाष्य केले. काटोल हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. त्यांचे नाव न घेता प्रफुल पटेल म्हणाले, काटोल-नरखेडमध्ये इतरांना कधी संधी मिळत होती का? पक्षाने अनेक नेत्यांन बळ दिले पण त्यांनी दुसऱ्या फळीतील नेते कधी तयार केले नाही ही शोकांतिका आहे.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय देण्याचे कबूल केले असल्याचे पटेल म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटात मात्र अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -