Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : शिंदेंसोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा मोठ्या मताधिक्यांनी...

Maharashtra Election Result 2024 : शिंदेंसोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव

Subscribe

बच्चू कडू यांनी स्वत: अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भाजपा महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे आणि ठाकरे गट महाविकास आघाडीकडून बाबलुभाऊ देशमुख यांचे आव्हान होते. आज निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर 12435 मतांनी विजय मिळवला आहे.

अचलपूर : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. यानंतर आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) सर्व मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हे निकाल समोर येताना काही धक्कादायक निकाल लागले आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Prahar Sanghatana leader Bachchu Kadu defeated from Achalpur)

एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते. यावेळी अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू हेही गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी बच्चू कडू हे महायुतीचा भाग बनले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेत महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती. यानंतर या आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 150 जागांवर आपले उमेदवार उतरवले.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; ठाकरेंनाही डिवचलं

बच्चू कडू यांनी स्वत: अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भाजपा महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे आणि ठाकरे गट महाविकास आघाडीकडून बाबलुभाऊ देशमुख यांचे आव्हान होते. आज निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर 12435 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रहार संघटनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

सरकार स्थापनेची होती तयारी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायच्या आधीच बच्चू कडू यांनी आपलंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, आम्ही लहान पक्ष आणि अपक्षांसोबत संपर्क करत आहोत. प्रस्थापितांनी थांबावं आणि लहान पक्षाचं सरकार यावं, अशाप्रकारचं गणित आम्ही मांडत आहोत. 10-15 जागा दुसऱ्या आघाडीच्या येतील. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांचं सरकार आम्ही स्थापन करू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महायुतीच्या वादळात मविआ भुईसपाट, सुरुवातीचा कल काय सांगतो? 


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -