घरताज्या घडामोडी'नशीब बलवत्तर म्हणून वाचलो', अपघातानंतर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ट्विटरवर केला संताप व्यक्त

‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’, अपघातानंतर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ट्विटरवर केला संताप व्यक्त

Subscribe

प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) याच्या गाडीला मुंबई-नाशिक हायवेवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) याच्या गाडीला मुंबई-नाशिक हायवेवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर एका अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे अपघात झाल्याचे प्राजक्त देशमुखने ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे. (prajakt deshmukhs car accident on mumbai nashik highway)

प्राजक्त देशमुखच्या ट्वीटमध्ये काय?

- Advertisement -

“नाशिक-मुंबई महामार्गावरुन जाणारी अवजड वाहने बेशिस्तीने वाहनं चालवत असतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतु या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पीडगन लावून दंडाच्या पावत्या ठोकणे इतकेच यांचे काम? तसेच, अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणे अपेक्षित असताना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडले. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा”, असे या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि कवी आहेत. प्राजक्त देशमुख याच्या 2017 मध्ये आलेल्या ‘देवबाभळी’ या नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) 14 सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गोदावरी या सिनेमाची निवड करण्यात आली. या सिनेमाचे संवाद लेखन प्राजक्त देशमुख याने केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘…मार्केटमध्ये इज्जत असावी लागते’, निलेश राणेंचा राऊतांना टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -