घरताज्या घडामोडीविश्वास नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही - प्रकाश आंबेडकर

विश्वास नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही – प्रकाश आंबेडकर

Subscribe

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आहे. परंतु शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्याने ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली नसल्याचे दिसून येत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

विश्वास नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही

अकोल्यात वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आहे. परंतु शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्याने ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली नसल्याचे दिसून येत आहे. पवारांच्या घरावर हल्ला होणार असल्याचे गुप्तहेर विभागाने चार दिवस आधीच मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

विशेष म्हणजे नांगरे पाटील यांच्या नावाने असणारे एक पत्र अॅड. सीपी लीगल ब्रँच यांनी नमूद केलेले आहे की, पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदावर नांगरे पाटील आहेत. त्यामुळे हे पत्र त्यांना संबोधित करण्यात आलेलं आहे. चार दिवस अगोदर माहिती असूनही पोलीस खात्याने काहीही केलेलं नाहीये. दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना सकाळ, संध्याकाळ सीपी किंवा अॅड. सीपी यांच्यापैकी कायदा व सुव्यस्थेच्या कायद्यावरती ब्रीफिंग केलं जातंय. राज्याच्या महत्त्वाच्या घटलेल्या घटनांमध्ये किंवा राज्यांमध्ये महत्त्वाच्या काही घटना घडणार असतील. ती सर्व माहिती शेअर करण्यात आल्याची माहिती आहे.

आपल्या बंगल्यावर देखील मोर्चा येणार ?

मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही विचारतोय की, आपल्या बंगल्यावर देखील मोर्चा येणार, त्यावेळ पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात तिथे आहे. इतरांच्या बंगल्यावरती आणि इतर लोकं राहतात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात यावेत, असे आदेश दिलेत का?, असे आदेश दिले असतील तर ज्यांनी अशा आदेशाचे पालन केलेलं नाहीये. त्यांच्या विरोधात आपण करणार आहात हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा…

नांगरे पाटील यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असाही खुलासा करावा की, नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही किंवा हे पत्र नांगरे पाटील आयुक्तांकडे जरी दिलं नसेल. त्यामुळे आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे दाखवलं नसल्याची शक्यता मी नाकारत नाही. सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करणं ही ज्याची जबाबदारी होती. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवणं आणि खुफीया माहिती घेणं हे असताना का केलं नाही. याचा खुलासा करण्यात यावा, असं आंबेडकर म्हणाले.


हेही वाचा : IPL 2022: रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात षट्कारांचे आव्हान, कोण आहे आघाडीवर?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -