घरमहाराष्ट्रदोन दिवसांपूर्वी पवारांना भेटलेले प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरड्यासारखे रंग बदलते

दोन दिवसांपूर्वी पवारांना भेटलेले प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरड्यासारखे रंग बदलते

Subscribe

बदलापूरः राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विश्वास ठेवू नका सांगितलं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस सरड्यासारखा रंग बदलते. आता चर्चा सुरु झाली आहे की भाजपसोबत आज जातील की उद्या जातील, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

बदलापूर येथे बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. गेली ३० वर्षे वाया गेली आहेत. धर्मांदांना वैचारिक आणि राजकीय विरोध करतील असं वाटलं होतं. तेच आज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार झाले आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म बदलू न देणे हा माणसाच्या स्वातंत्र्यावर आघात आहे. आज मुस्लिमांना टार्गेट केलं जातयं म्हणून परिस्थिती वेगळी आहे. उद्या परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे ज्यांना ज्या कोणत्या धर्माला मानायचे असेल त्याला मानू द्या. कोणताही धर्म कोणावर लादू नका. धर्म लादलात तर प्रतिक्रिया येईल. परिणामी या देशात शांतता राहणार नाही. लोकं हमरीतुमरीवर उतरतील. हमरीतुमरी व्हावी, असं काहींना वाटतं आहे. ही वृत्ती लक्षात घ्या. ही वृत्ती हाणून पाडायची असेल तर स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर आणि कर्तृत्त्वार विश्वास ठेवा. तर देशात शांतता राहिल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यावे की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास आमचा विरोध नाही. जागा वाटपात ठाकरे गटाने त्यांच्या जागा वंचित आघाडीला द्याव्यात, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. तसेच कॉंग्रेसनेही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास होकार दिला होता. मात्र सध्या अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. हे वृत्त अजित पवार यांनी फेटाळून लावले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -