Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदेंनी इतिहास तपासावा, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघडीवरुन राऊतांचा पलटवार

प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदेंनी इतिहास तपासावा, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघडीवरुन राऊतांचा पलटवार

Subscribe

संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा इतिहास तपासावा. असा कोणताही सल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला नव्हता, असं म्हणत राऊतांनी उत्तर दिलं आहे.

वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. यासभेवेळी प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल, असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचाही हाच सल्ला होता, असं म्हणत आंबेडकरांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.( Prakash Ambedkar and Eknath Shinde should examine history Sanjay Raut s counter attack )

संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा इतिहास तपासावा. असा कोणताही सल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला नव्हता, असं म्हणत राऊतांनी उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे. त्यांचा प्रयत्न आहे की, यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सोबत यावे. त्यासंदर्भात मी म्हटलं की, नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटाने निर्णय घेतला तर अधिक चांगले आहे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.

तसचं, राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष असल्याचं मोठं विधान करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेटम जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील, असं वक्तव्य करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार, हे विधान करुन जे गुमराह केलं जातं आहे, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं पाहिजे.

- Advertisement -

( हेही वाचा: राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला; ‘या’ नेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य )

- Advertisment -