आंबिल ओढा प्रकरणातील बिल्डरवर कारवाई करा, प्रकाश आंबेडकर संतापले

आंबिल ओढा अतिक्रमणामध्ये पाडलेली घरे पुन्हा बांधुन द्या

I think Ajit Pawar is the Chief Minister prakash ambedkar slams uddhav thackeray
आंबिल ओढा प्रकरणातील बिल्डरवर कारवाई करा, प्रकाश आंबेडकर संतापले

आंबिल ओढ्यातील अतिक्रिमण हटवण्यासाठी आणि घर पाडण्यासाठी मोठा पोलीस ताफा लावण्यात आला होता. घरे पाडताना स्थानिक रहिवाशांनी मोठा आक्रोश करत विरोध प्रदर्शन केलं होतं या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल केला आहे. तसेच संबंधित बिल्डर, यंत्रणा आणि आयुक्तांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचे इशारा प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कारवाईची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडण्यासाठी कुठला आदेश दिला नव्हता. तसेच पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलं नव्हते. पावसाळ्याच्या दिवसात आणि जून, जुलैच्या महिन्यात कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने दिले होते तरी पोलिसांनी कशी कारवाई केली? कोणाचा आशिर्वादाने अतिक्रमाण करण्यात आले हे पाहून संबंधित बिल्डरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

संबंधित अधिकारी आणि बिल्डरवर कारवाई झाली नाहीतर पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्का आयोगाकडे जाणार असल्याचा इशार आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच गृहमंत्री या प्रकरणावर कोणती कारवाई करतील असे वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पाडलेली घरे बांधून द्या

वंचित बहुजन विकास आघाडीकडून आंबिल ओढ्यातील कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी अतिक्रमणामध्ये पाडलेली घरे पुन्हा बांधुन द्या अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात स्थानिक महिलाही सामिल झाल्या होत्या. या महिलांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी घटनास्थळी पोबारा केला होता. सुप्रिया सुळेंनी आंदोलकांशी संवाद साधला परंतु आंदोलकांनी अजित पवार यांच्याच नावाने घोषणाबाजी केली होती. अजित पवार मुर्दाबाद अशी घोषणा महिला आंदोलकांनी दिल्या आहेत.